maharashtra

साताऱ्यात मुसळधार पाऊस ; जनजीवन ठप्प

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची पळापळ ; अनेक विक्रेत्यांचे नुकसान

सायंकाळी मुसळधार पावसाने सातारा शहर परिसराला झोडपून काढल्यामुळे तब्बल तासभर जनजीवन ठप्प झाले होते. धो धो पाऊस पडल्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दुसरीकडे रस्त्यावर बसलेल्या साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे फार मोठे नुकसान झाले.

सातारा : सायंकाळी मुसळधार पावसाने सातारा शहर परिसराला झोडपून काढल्यामुळे तब्बल तासभर जनजीवन ठप्प झाले होते. धो धो पाऊस पडल्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दुसरीकडे रस्त्यावर बसलेल्या साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे फार मोठे नुकसान झाले.
सातारा शहर व परिसरात सलग चार दिवस पाऊस पडत आहे. आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवेमध्ये उष्मा ही मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक सातारा शहर व परिसरात ढगांच्या गडागडाटासह धो- धो पाऊसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास पावसाने शहराला झोडपून काढल्यामुळे शहरातील ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून रस्त्याने वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दुसरीकडे गणेश देखावे पाहण्यासाठी सायंकाळी सात नंतर शहरात गर्दी होऊ लागल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा फार मोठ्या प्रमाणावर साहित्य विक्रीसह खाद्यपदार्थांचे गाडे लागले आहेत. या पावसामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी शाळेतून घरी जाणाऱ्या मुलांनाही पावसापासून वाचण्यासाठी आसरा शोधावा लागला. गेल्या चार दिवसांपूर्वी पडत असलेला पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली असून पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेश देखाव्यांवर पावसाचे सावट
तब्बल दोन वर्षानंतर गणेश देखावे पाण्यासाठी सातारकर फार मोठ्या प्रमाणावर सायंकाळनंतर घराबाहेर पडू लागले आहेत. आज साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने शहर व परिसराला झोडपून काढल्यामुळे गणेश देखाव्यांवर पावसाचे सावट निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.