maharashtra

आरंभ प्रशिक्षण केंद्राची वडूज अंगणवाडी सेविका मार्फत भव्य दिव्य सुरुवात


A grand divine start of the training center through Vaduj Anganwadi Sevika
आरंभ प्रशिक्षण केंद्राचा वडूज अंगणवाडी सेविका मार्फत भव्य दिव्य शुभारंभ करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या मानसिक बदल, त्यांची आवडनिवड व इतर गोष्टींच्या बाबत योग्य पद्धतीने अंगणवाडी सेविका यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

सातारा : आरंभ प्रशिक्षण सुरुवातीचे क्षण मोलाचे 0 ते 3 वर्ष व वय गटातील बालकांचा वाढ आणि विकास या बद्दल विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आरंभ प्रशिक्षण केंद्राचा वडूज अंगणवाडी सेविका मार्फत भव्य दिव्य शुभारंभ करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या मानसिक बदल, त्यांची आवडनिवड व इतर गोष्टींच्या बाबत योग्य पद्धतीने अंगणवाडी सेविका यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
लहान बालकाच्या मेंदूचा विकास या वयामध्ये जास्त प्रमाणात होतो त्यासाठी पालकांचा सहभाग तसेच अंगणवाडी सेविकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. पालकांनी बालकांची संवेदनशील रहावे तसेच सेविकेने वारंवार पालक भेटी माता सहभाग घेऊन त्यांना बालकांच्या वाढ आणि विकास या मधला फरक लक्षात घ्यावे असे प्रतिपादन  नगरसेविका सौ रेश्मा बनसोडे,सौ शोभा माळी,पर्यवेक्षिका सौ एस आर काकडे, पूजा  गायकवाड, संरक्षण अधिकारी आर. के. जाधव,सौ राधिका गोडसे यांनी केले.
लहान बालकांना समजावून देऊन त्यांचा बौद्धिक विकास आणि वाढ बद्दल प्रयत्नशील राहण्यासाठी पालकांनीही प्रयत्न करणे किती गरजेचे आहे ? हे पटवून देण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरले आहे. त्यासाठी हा एक चांगला आरंभ झाला आहे असे गौरविण्यात आले.  पहिला सत्र पहिले : स्वागत आणि परिचयसत्र दुसरे : पूर्वचाचणी सत्र तिसरे : वाढ आणि विकाससत्र चौथे : बालविकास सत्र पाचवे : संवेदनशील पालकत्व
सत्र सहावे : सुरक्षित वातावरण अशा पद्धतीने हे आरंभ प्रशिक्षण केंद्रात जोमाने कार्याला सुरुवात झाली आहे.                             मेंदूची वाढ विरुद्ध शारीरिक वाढ, बालकाच्या पालकांच्या प्रतिक्रिया चक्र म्हणजे  बालकाची हालचाल कृती,निगा राखणाऱ्या व्यक्तीने संवेदनशील पणे गरज ओळखणे, निगा राखणाऱ्या व्यक्तीने प्रतिसाद देऊ गरज पूर्ण करणे, प्रतिसादावर बालकाची प्रतिक्रिया,प्रतिक्रियेवर निगा राखणाऱ्या व्यक्तीचा प्रतिसाद असे आहे.या वेळी वडूज नगरपंचायतीचे मान्यवर नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. प्रस्तावना सौ काकडे व सौ सोनम जगताप यांनी केले तर सौ मंगल गोडसे यांनी केले.
मोहन घोरपडे, गोविंद डोईफोडे, सौ.छाया कदम या सत्कार मूर्तीनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. उपाध्यक्ष मुजावर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार पिसाळ व उज्ज्वला मोरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी, गोरख रूपनवर, श्रीकांत लावंड, गुलाब पठाण, सौ.सुनंदा शिवदास यांनी विशेष परिश्रम घेतले. 'वंदे मातरम' राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप करणेत आला. कार्यक्रमास जिल्हयातील हिंदी शिक्षक,सत्कारमूर्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.