कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.
सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.
गेल्या आठ दिवसांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फूट उचलून नदीपात्रात 56000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे काही अंशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठाच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे दरवाजे आज सकाळी पूर्ण बंद करण्यात आले असून केवळ पायथा वीज गृहातून 2100 क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.
इतर धरणातील उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी कंसात
धोम - 10.66 (91.18), धोम-बलकवडी 3.62 (91.43), कण्हेर - 8.50 (88.56), उरमोडी - 9.13 (94.58), तारळी- 5.34 (91.48), निरा-देवघर 10.44 (89.02), भाटघर-23.17 (98.59), वीर - 9.00 (95.68).


