koynadam

esahas.com

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर होता.

esahas.com

पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्ण बंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.

esahas.com

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटावर

तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.

esahas.com

पावसाचा जोर कायम: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल.

esahas.com

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट नऊ इंचावर

कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे