महागाव गावच्या हद्दीत रेल्वेच्या धडकेत एका म्हैशीचा मृत्यू
चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रेल्वे मालगाडीच्या समोर अचानक काही म्हैशी आल्यामुळे चालकाने रेल्वे मालगाडीला अचानक ब्रेक लावला. मात्र या अपघातात एका म्हैशीचा मृत्यू झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळत अन्य म्हैशी किरकोळ जखमी झाल्या.
सातारा : महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रेल्वे मालगाडीच्या समोर अचानक काही म्हैशी आल्यामुळे चालकाने रेल्वे मालगाडीला अचानक ब्रेक लावला. मात्र या अपघातात एका म्हैशीचा मृत्यू झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळत अन्य म्हैशी किरकोळ जखमी झाल्या.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारच्या सुमारास पुणे येथून मिरजकडे रेल्वे गाडी निघाली होती. सातारा रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या महागाव गावच्या हद्दीत अचानक रेल्वे मार्गावर मालगाडीच्या समोर १० म्हैशी आल्याने झालेल्या रेल्वे अपघातात एका म्हैशीचा मृत्यू झाला. मालगाडी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अन्य म्हैशींना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानंतर पुणे-मिरज रेल्वे मार्ग काही काळासाठी बंद ठेवून रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने मृत म्हैशीला बाहेर काढल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.