युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना आडमुठे पणा आणि परावलंबी धोरणाचे परिणाम आताचे घडीला संपूर्ण युक्रेन ला भोगायला लागत आहे. चर्चेतून सुटू शकणाऱ्या बाबीसाठी आज महायुद्ध सुरु झाले आहे. भारत स्वतंत्र काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना हल्ले करत होते परंतु पाश्चिमात्य देश जपान हल्ले करत आहे अश्या बातम्या पेरत होते तसेच सद्यस्थितीला मीडिया तसेच सर्वत्र युक्रेनच्या पराक्रमाच्या बातम्या येत असल्या तरी वास्तवामध्ये रशियाने आतापर्यंत केलेले हल्ले आणि त्यातून युक्रेनचे झालेले नुकसान भरून यायला युक्रेनला कमीतकमी २० वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत असून हे युद्ध असेच सुरु राहिले तर युक्रेन सारखा देश स्वतःचे नामोनिशाण गमवालेशिवाय राहणार नाही.
आज पूर्ण जगातील सर्वात चर्चेतील देश असेल तर उत्तर नक्कीच युक्रेन हेच असेल. रशियाने केलेला हल्ला आणि त्यावर संपूर्ण जगातून सहानभूती मिळवण्यात युक्रेन आणि त्यांचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना यश आले असले तरी या रशियाच्या हल्ल्याची पाळेमुळे इतिहासात लपलेली आहेत. रशियाची युक्रेनकडे प्रमुखाची मागणी नाटो देशांमध्ये समाविष्ठ होऊ नये हि होती. तसे पहिले तर सद्यस्थितीला कोणतेही संकट किंवा विरोधक नसताना पण युक्रेनला पाश्चिमात्य देशानी स्वतःच्या स्वार्थसाठी तसेच रशियासमोर कटपुतली म्हणून वापर केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना आडमुठे पणा आणि परावलंबी धोरणाचे परिणाम आताचे घडीला संपूर्ण युक्रेन ला भोगायला लागत आहे. चर्चेतून सुटू शकणाऱ्या बाबीसाठी आज महायुद्ध सुरु झाले आहे. भारत स्वतंत्र काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना हल्ले करत होते परंतु पाश्चिमात्य देश जपान हल्ले करत आहे अश्या बातम्या पेरत होते तसेच सद्यस्थितीला मीडिया तसेच सर्वत्र युक्रेनच्या पराक्रमाच्या बातम्या येत असल्या तरी वास्तवामध्ये रशियाने आतापर्यंत केलेले हल्ले आणि त्यातून युक्रेनचे झालेले नुकसान भरून यायला युक्रेनला कमीतकमी २० वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत असून हे युद्ध असेच सुरु राहिले तर युक्रेन सारखा देश स्वतःचे नामोनिशाण गमवालेशिवाय राहणार नाही. युक्रेनच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रसंघात पुतीन याना हिटलर चे नाव न घेता हिटलर प्रमाणे आत्महत्या करण्याचा दिलेला सल्ला युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनाच लागू होईल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमात पराक्रमाच्या बातम्या देऊन युक्रेन जगाच्या डोळ्यात धूळ फेकत स्वतःच्या पायावर दगड मारून घेताना दिसत आहे. रशियाने आतापर्यंत शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत त्यांनी युक्रेनमधील प्रमुख सर्व शहरे बेचिराख केली आहेत. युक्रेन सैन्याच्या शहरामधून सामान्य नागरिकांचे मागे लपून रशियन सैन्यावर हल्ले करणेची रणनीती केलेमुळे रहिवासी परिसरातपण रशियाकडून हल्ले सुरु आहेत त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
युक्रेन - भारत - रशिया संबंध
युक्रेन हे शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करत असून भारतामधील जवळपास २० हजार विद्यार्थी युक्रेन मध्ये शिक्षण घेत आहेत . राजनेतिक क्षेत्रात युक्रेन आणि भारताचे संबंध फार काही चांगले नसून युक्रेनने बऱ्याच वेळी संयुक्त राष्ट्रसंघात भारतविरोधी भूमिका घेतली असून भारताविरुद्ध मतदान पण केले आहे. परंतु भारत रशिया संबंध पूर्वीपासून जिवलग मित्राप्रमाणेच राहिले असून भारताच्या सुरक्षा तसेच प्रत्येक क्षेत्रात शियाचे योगदान खूप मोठे आहे. हल्लीच्या काळात चीनने गलवान खोरेत केलेली घुसखोरीचे वेळी पुतीन यांनी भारताचे बाजूने असून वेळ पडली तर रशियन सैन्यसुद्धा भारतासाठी लढेल या भाषेत चीनला धमकी दिली होती.
नाटोच्या मुद्यासाठी रशियाने महायुद्धचे एवढे मोठे पाऊल का उचलले ?
नाटो म्हणजे अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्या नेतृत्वात काम करणारी संघटना जी पारंपरिक रशियाची प्रतिस्पर्धी संघटना असून याच संघटनेमुळे सोव्हियत युनियनचा ऱ्हास झाला. याच संघटनेमुळे रशियाचे सुपर पॉवर व्ह्याचे स्वप्न आजपर्यंत अपूर्ण राहिले आहे. अशा या नाटो समुदायचे सदस्य व्ह्याचे स्वप्न युक्रेनच्या राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की याना अमेरिका व युरोपियन युनियनने दाखवले. रशियाच्या पारंपरिक शत्रूंसोबत ३०० वर्ष मैत्री असलेल्या मित्रराष्ट्राने केलेली गद्दारी तसेच युक्रेनच्या नाटोमध्ये समाविष्ट झालेमुळे संपूर्ण रशिया देशच नाटोच्या क्षेपणास्त्र कक्षेत येत असलेमुळे रशियाने यास तीव्र विरोध केला होता परंतु युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांचेवर अमेरिका व युरोपियन युनिअनचा पगडा निर्माण झाला होता त्यात रशियाने हल्ला केला तर अमेरिका आणि नाटो देश आपलेला मदत करतील या चुकीच्या समजुतीमुळे युक्रेनने बलाढ्य रशियाच्या मागण्या युक्रेनने धुडकावून लावल्या त्यात रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे धाडशी आणि प्रचंड देशप्रेमी असलेमुळे राष्ट्र सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणेचे त्यांचे धोरणामुळे रशियाने महायुद्धचे एवढे मोठे पाऊल का उचलले.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की याचा जीवनप्रवास
लॉ मध्ये ग्रेजुएशन केले पूर्ण :यहूदी धर्मात जन्माला आलेले वोलोदिमीर जेलेंस्की यांचा जन्म 25 जानेवरी, 1978 ला यूक्रेन मध्ये झाला. यांचे वडील ऑलेक्जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले.
एक काळ असा होता की, वोलोदिमीर आपल्या कॉमेडी शैलीसाठी प्रसिद्ध होते.याची सुरुवात शिक्षण घेत असताना झाली. ही कला त्यांच्या अंगी आधी होती.याची जाणीव त्यांना शिक्षण घेताना झाली. 1997 मध्ये वोलोदिमीर यांनी काही अभिनेत्यासोबत एकत्र येऊन ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. लोकांनी वोलोदिमीर यांच्या कामाला खूप पसंती दिली. ज्याचा परिणाम इतका झाला की , 2003 मध्ये त्यांनी आपले कार्यक्रम सुरू केले. स्वतः च्याच एका कार्यक्रमातून प्रेरीत होऊन भविष्यात राजकारण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचे त्यांनी ठरवले. अशाप्रकारे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.
व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन यांचा जीवनप्रवास
व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड, रशियन SFSR, सोव्हिएत युनियन (आताचे सेंट पीटर्सबर्ग, रशिया) येथे झाला. व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतिन (1911-1999) आणि मारिया इव्हानोव्हना पुतिन (1911-1999) यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान. née शेलोमोवा (1911-1998). व्लादिमीर पुतिन यांचे आजोबा स्पिरिडॉन पुतिन हे व्लादिमीर लेनिन आणि जोसेफ स्टालिन यांचे वैयक्तिक स्वयंपाकी होते. पुतिनचा जन्म 1930 च्या मध्यात जन्मलेल्या व्हिक्टर आणि अल्बर्ट या दोन भावांच्या मृत्यूपूर्वी झाला होता. अल्बर्टचा बालपणातच मृत्यू झाला आणि दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या सैन्याने लेनिनग्राडच्या वेढादरम्यान डिप्थीरियामुळे व्हिक्टरचा मृत्यू झाला. पुतिन यांची आई कारखाना कामगार होती आणि त्याचे वडील सोव्हिएत नौदलात भरती होते, 1930 च्या सुरुवातीस पाणबुडीच्या ताफ्यात सेवा करत होते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला, त्याच्या वडिलांनी NKVD च्या विनाश बटालियनमध्ये काम केले. नंतर, त्यांची नियमित सैन्यात बदली करण्यात आली आणि 1942 मध्ये ते गंभीर जखमी झाले. पुतीनच्या आजीची 1941 मध्ये टव्हर प्रदेशातील जर्मन कब्जाकर्त्यांनी हत्या केली आणि त्यांचे मामा दुसऱ्या महायुद्धात पूर्व आघाडीवर गायब झाले. 1 सप्टेंबर 1960 रोजी पुतिन यांनी त्यांच्या घराजवळील बास्कोव्ह लेन येथील शाळा क्रमांक 193 मध्ये सुरुवात केली. तो अंदाजे ४५ विद्यार्थ्यांच्या वर्गातील काही जणांपैकी एक होता जे अद्याप यंग पायोनियर संस्थेचे सदस्य नव्हते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी साम्बो आणि ज्युडोचा सराव करण्यास सुरुवात केली. पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग हायस्कूल 281 मध्ये जर्मन भाषेचा अभ्यास केला आणि ते जर्मन बोलतात. पुतिन यांनी 1970 मध्ये आंद्रेई झ्डानोव्ह (आताचे सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी) नावाच्या लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि 1975 मध्ये पदवी प्राप्त केली. त्यांचा प्रबंध "द मोस्ट फेव्हर्ड नेशन ट्रेडिंग प्रिन्सिपल इन इंटरनॅशनल लॉ" या विषयावर होता. तेथे असताना, त्याला सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षात सामील होणे आवश्यक होते आणि त्याचे अस्तित्व संपेपर्यंत तो सदस्य राहिला (ऑगस्ट 1991 मध्ये तो बेकायदेशीर ठरला). पुतिन यांनी अनातोली सोबचॅक या सहाय्यक प्राध्यापकाची भेट घेतली, ज्यांनी व्यवसाय कायदा शिकवला[f] आणि नंतर ते रशियन राज्यघटनेचे आणि फ्रान्समध्ये छळलेल्या भ्रष्टाचार योजनांचे सह-लेखक बनले. सेंट पीटर्सबर्गमधील सोबचॅकच्या कारकिर्दीत पुतिन प्रभावशाली असतील. मॉस्कोमधील पुतिन यांच्या कारकिर्दीत सोबचॅक प्रभावी ठरेल.देशात राजनैतिक स्थैर्य आणणे आणि कायदा सुव्यवस्था पुनःप्रस्थापित करण्याचे श्रेय पुतिन यांना दिले जाते. दुसर्या चेचेन युद्धानंतर पुतिन यांनी राष्ट्रीय एकात्मता पुनःस्थापित केली. पुतिन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत रशियन अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून वर आली. सलग ९ वर्षे रशियन अर्थव्यवस्थेत वृद्धी होत आहे. पुतीन यांचे काळात रशिया देशाचे सकल आर्थिक उत्पन्न ७२% वाढले आहे आणि गरिबी ५०%नी घटली. देशातील जनतेचे सरासरी मासिक उत्पन्न ८० अमेरिकी डॉलरांहून वाढून ६४० अमेरिकी डॉलर झाले आहे.


