maharashtra

धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू


One was found dead under a running train
धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

सातारा : धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोणेगाव तालुका कराड गावच्या हद्दीत मसूर शिरोडे रेल्वे स्टेशन दरम्यान अनिल उत्तम चव्हाण रा. कोणेगाव, ता. कराड यांचा धावत्या रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची खबर हनीफ गौस साब शेख वय 48 रा. कोणेगाव, ता. कराड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक तपास पो.ना. डोंगरे हे करीत आहेत.