दरुज, ता. खटाव येथील द्रोणाचार्य ॲकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षकाने शिवीगाळ व मारहाण केली असल्याची फिर्याद पिडीत महिला प्रशिक्षणार्थीने पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
पुसेगाव : दरुज, ता. खटाव येथील द्रोणाचार्य ॲकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षकाने शिवीगाळ व मारहाण केली असल्याची फिर्याद पिडीत महिला प्रशिक्षणार्थीने पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दरुज ता. खटाव येथील द्रोणाचार्य ॲकॅडमीच्या मैदानावर मैदानी सरावाच्यावेळी थकवा आल्यामुळे मैदानावर विश्रांतीसाठी बसलेल्या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षक जगन्नाथ बाबा साठे ( राहणार - सिध्देश्वर कुरोली, ता. खटाव ) याने उठण्यास सांगितले. त्यानंतर तिला शिवीगाळ केली. पण शिवीगाळ करु नका असे तिने सांगितल्यावर आरोपी जगन्नाथ साठे याने पुन्हा शिवीगाळ करुन हातातील काठीने दोन्ही पायांच्या लवणींवर मारहाण केली. तसेच याबाबत कोणाकडे तक्रार केल्यास बघून घेईन, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद या महिला प्रशिक्षणार्थीने पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. हवालदार एस. एस. भोसले अधिक तपास करत आहेत.


