रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून 43 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊर कोरेगाव च्या हद्दीत बिचुकले पुलावर घडली.
सातारा : रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून 43 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊर कोरेगाव च्या हद्दीत बिचुकले पुलावर घडली.
याप्रकरणी आदित्य संतोष पोळ राहणार देऊर तालुका कोरेगाव यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, देऊर ते कोरेगाव यादरम्यान बीचुकले वस्तीच्या दरम्यान असणारा रेल्वे पुलावर संतोष पोळ हे रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्यांना रेल्वेची जोरदार धडक बसली. डोक्याला गंभीर मार लागून जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गिरी अधिक तपास करत आहेत.


