शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख व कराडचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक (वय 62) यांचे सोमवारी २२ रोजी रात्री उशिरा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कराड शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
कराड : शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख व कराडचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक (वय 62) यांचे सोमवारी २२ रोजी रात्री उशिरा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कराड शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
रामभाऊ रैनाक यांनी १९८८ साली कराड शहरातून शिवसेनेमधून आपला राजकीय प्रवास सुरु केल्यांनतर यांच्यावर शिवसेना कराड शहर प्रमुख पदाची जबाबदारी आली. त्यानंतर शहरासह तालुका आणि जिल्ह्यातही शिवसेना वाढीस लावत त्यांनी ती जबाबदारी कौशल्यपूर्वक पार पाडली. त्यांनी शिवसैनिकांचे एक मजबूत संघटन बनवून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या अंगी असलेली उपक्रमशीलता, संघटन कौशल्य आणि मनमिळावू स्वभावाच्या रामभाऊ रैनाक यांनी जिल्हाभरात शिवसेनेचा प्रसार आणि प्रचार केला. कराडसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही शिवसेना रुजवण्याचे व वाढविण्यामध्ये रामभाऊ रैनाक यांचा मोलाचा वाटा होता.
कराडसह जिल्ह्यात तीन दशकाहून अधिक काळ शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते ते नेते म्हणून रामभाऊ रैनाक यांची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर सातारा उपजिल्हाप्रमुख पदाची धुरा देण्यात आली होती. तसेच त्यांनी एस.टी कामगार सेनेच्या कार्यातही नेतृत्वाचा ठसा उमटवला होता. तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख होती. रामभाऊंच्या अकाली निधनाने कराड शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत मंगळवारी २२ सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.