maharashtra

विनयभंग प्रकरणी सातारा येथील दोघांवर गुन्हा


सातारा शहरांमध्ये रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येथीलच दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सातारा : सातारा शहरांमध्ये रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येथीलच दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ ऑक्टोंबर रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील एका पेठेत असणाऱ्या एका मंदिरासमोरून रस्त्यावरून एक बावीस वर्षीय गृहिणी चालत घरी जात असताना आकाश धनंजय साळुंखे रा. माची पेठ,  सातारा आणि सौरभ पवार रा. शाहूनगर, सातारा या दोघांनी त्या गृहिणीचा विनयभंग केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.