परतीच्या पावसाचे थैमान
ओढ्यात कार वाहून गेल्याने फलटण तालुक्यात बापलेकीचा बुडून दुर्दैवी मृत्यू
पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटणमधील सोमंथळी येथे मोठी घटना घडली आहे. या घटनेत सोमंथळी पावसामुळे ओढ्याला अचानक पूर आला आणि या पुरात कार बुडाली. ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. मात्र या घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे.
सातारा : परतीच्या पावसाचा फटका पुण्यासह सातारा जिल्ह्यातील काही भागालाही बसला आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटणमधील सोमंथळी येथे मोठी घटना घडली आहे. या घटनेत सोमंथळी पावसामुळे ओढ्याला अचानक पूर आला आणि या पुरात कार बुडाली. ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. मात्र या घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी जोरदार पाऊस झाला. फलटण तालुक्यातही तुफान पाऊस झाल्याने सोमंथळी- सस्तेवाडी दरम्यानच्या ओढ्याला सोमंथळी येथे पूर आला होता. ओढ्याला आलेल्या पुरात पाण्याचा अंदाज न आल्याने या दुर्दैवी घटनेत पिता-पुत्रीसह एर्टिगा कार बुडाली. या घटनेने फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी स्थानिक ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. मात्र या दुर्दैवी घटनेत माण तालुक्यातील वारूगड येथील छगन मदने आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी प्रांजल मदने यांचा मृत्यू झाला आहे.