maharashtra

दुघी गावच्या हद्दीत रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू


दुघी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : दुघी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० रोजी ८ वाजण्याच्या सुमारास दुघी गावच्या हद्दीत म्हारकी नावच्या शिवारात रेल्वे लाईनवर सौ. स्वाती नवनाथ लाड, वय ३६, रा. दुघी या महिलेला रेल्वेने धडक दिल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची खबर नवनाथ संपत लाड यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.