maharashtra

सातारा शहर परिसरात सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस


Heavy rain in Satara city area for the second day
सातारा शहराला सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होत संपूर्ण परिसर अंधारून गेला. ढगांनी दाटी केल्यानंतर चार वाजल्यापासून या पावसाला जोरदार सुरुवात झाली.

सातारा : सातारा शहराला सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होत संपूर्ण परिसर अंधारून गेला. ढगांनी दाटी केल्यानंतर चार वाजल्यापासून या पावसाला जोरदार सुरुवात झाली.
आजच्या पावसाचे वैशिष्ट्य हेच होते की, मेघगर्जना न होता हा पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार कोसळत होता. त्यामुळे संपूर्ण शहरातील प्रमुख रस्ते हे सुनसान झाले होते. कामासाठी रस्त्यावर ये-जा करणार्‍या नागरिकांनी आडोसा शोधला. तसेच सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून या पावसाचे पाण्याचे लोट वाहताना दिसून येत होते. बुधवारी दुपारनंतर जोराचा पाऊस झाला त्यानंतर वातावरण बदलले.
सकाळी आज कडकडीत ऊन पडले होते. मात्र दुपारनंतर सलग दुसर्‍या दिवशी या जोरदार पावसाला सुरुवात झाली. एकंदरीतच मागील पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने हा जोराचा सुर सलग दोन दिवस लावून धरल्यामुळे आता शेतकर्‍यांना चिंता वाटू लागली आहे. अनेक सखल शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने उगवून आलेल्या धान्याला त्याचा मोठा फटका बसणार असून पाणी साचून राहिल्यामुळे उगवून आलेली रोपे कुजून जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. विशेषतः सोयाबीन, मका, ज्वारी आदि पिकांना या पावसाचा मोठा फटका बसत आहे.