नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 जुलैपासून सुरू होत आहे. विरोधकांनी पुन्हा सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्याचवेळी राज्यसभेत भाजपच्या 86 जागा आहेत आणि मित्रपक्षांसह एनडीएकडे 101 जागा आहेत. चार वर्षांनंतर भाजपचे संख्याबळ 90च्या खाली गेले आहे. 13 जुलै रोजी पक्षाचे 4 नामनिर्देशित सदस्य निवृत्त झाले. राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या 245 आहे. सध्या 226 खासदार आहेत. यामध्ये बहु...
सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
अलिकडच्या काळात सातारा जिल्ह्यात समाजविघातक ज्या घटना मुद्दामपणे घडवल्या जात आहेत.
मेढ्यात शेतक-यांनी नेत्यांवर दाखविला विश्वास.
भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकी निम्मित बयंदूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवार गुरुराज गंटीहोले यांच्या प्रचारार्थ तल्लूर, सप्लाडी, हत्यानगडी, कन्याला आदी गावा गावात जाऊन घरो घरी प्रचार केला. तदप्रसंगी उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी, कर्नाटक विधानपरिषद सदस्य भारती शेट्टी, ओबीसी मोर्चाचे गोविंद पुजारी, सदानंद उपेनकुदी...
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. याचा निषेध म्हणून सातारा शहरात भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 318 पैकी एकहाती 98 ग्रामपंचायती जिकल्या आणि भाजपा सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि साताऱ्यातील पोवई नाका येथे पाकिस्तानचे झेंडे आणि बिलावल भुट्टो झरदारी चा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवतगीता चा दाखला देताना अत्यंत हीन दर्जाच्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या विकृत विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले त्या बद्दल भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले आणि शिवराज पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुर्गा उत्सवाच्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार हमीद खान व नुरखान पठाण यांनी कोरेगाव पोलिसात दिली आहे. त्यानुसार विक्रम पावसकर यांच्यावर आयपीसी १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कॉरिडोरच्या कार्यक्षेत्रावरून माण तालुक्यामध्ये आणि उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये गटा-तटाचा राजकीय वादंग सुरू आहे. याचे साद-पडसाद आगामी सातारा जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहेत.
कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नुकताच झालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजार रुपयांचा भाव काढण्यात आला होता, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आ. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून सातारा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात फलटण पासून करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश दिनांक 28 ते 30 जून दरम्यान सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये केंद्र शासनाच्या अनुदान योजना, त्याचा प्रसार-प्रचार, संघटनात्मक पातळीवर सदस्य आणि कार्यकारणीशी चर्चा तसेच जाहीर मेळावे आणि रॅली असा भरगच्च दौरा आखण्यात आला आहे. याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जयकुमार गोरे यांनी गत महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सवोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार आमदार जयकुमार गोरे प्रक्रिया करुन सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या मायणी प्रकरणात गोरे यांना जामीन मंजूर झाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर रोटर फिरवून भाजपशी घरोबा केल्यानंतर उणेपुरे पंधरा दिवस उलटतात न उलटतात तोच जिल्हा राष्ट्रवादीतील कद्दावर नेते समजले जाणार्या सभापतींनी आज कोरेगाव उत्तर मध्ये कार्यकर्त्यांचा सिक्रेट मेळावा घेवून भाजपात जावून आपले पद वाचविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
भाजपच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत असणार्या महिला व युवक संपर्कप्रमुख यांची आज बुधवारी सकाळी दहा वाजता पनवेल, नवी मुंबई येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास हॉलमध्ये बैठक उत्साहात संपन्न झाली.
फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कायम भूमिका घेत असल्याच्या कारणाने व पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींच्या वर खोटेनाटे आरोप करत असल्याकारणाने जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे.
संभाजीराजे हे छत्रपती असल्याने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी भाजपसोबतच रहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याने ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्णय बदलून भाजपसोबतच राहावे, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपाला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी दिली आहे.
माथाडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज दि. 2 एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना याबाबतचे पत्र दिले आहे.
भाजपला फार मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी अत्यंत संघर्ष करून हा पक्ष उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली. सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार असून भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल असा विश्वास भाजपचे आमदार आणि सातारा जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
भाजपचे माणचे आक्रमक शैलीचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी ही घोषणा केली. माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती झाली आहे.
सातारा शहरातून जाणाऱ्या कण्हेर उजव्या कॅनॉलची दुरुस्ती करावी किंवा नागरी वस्तीमध्ये पाईपलाईन टाकावी, अशी मागणी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. या कालव्याची अत्यंत दूरावस्था झाली असून पाणी गळती वाढल्याने ही मागणी करण्यात आली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटिशीचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि नोटीस जाळली.
सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्यांनी केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या मागणीला दुजोरा देत भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
शिरवळ, ता. खंडाळा येथे बिबेवाडी, पुणे येथील एकाचा डोक्यात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी आज पुणे येथे अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिरवळ पोलिसांनी यापूर्वीच या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.
देशाचे प्रधानमंत्री हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केला. खरेतर, पटोले यांनी पंतप्रधानांचे नाव वापरलेले नाही. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ केला असून त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप करत आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत सुरू झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपकडून एक दक्षता समिती जाहीर करण्यात आली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. १८ जानेवारी) याबाबतची माहिती दिली.
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर भाजपाबद्दल विपर्यास चर्चा सुरु आहे. भाजपाची विभागणी झाली असून भाजपाचे कार्यकर्ते अर्धे तिकडे व अर्धे इकडे अशा प्रकारची वृत्ते प्रसिध्द होत आहेत. मात्र, भाजपा हा कोणासाठी व कोणाचा तरी पर्याय नसून भाजपा हे स्वतंत्र सत्ता केंद्र आहे.
केसरकर पेठेतील मानस हॉटेलसमोरील व्हॉल्वला तब्बल नऊ तास गळती लागून लाखो लीटर पाणी वाया गेले. या घटनेचा निषेध म्हणून भाजपचे स्वीकृत नगरसेवक सुनील काळेकर यांनी याच गळतीचे पाणी बादलीत भरून पालिका मुख्याधिकार्यांच्या केबिनसमोर ओतले. सोमवारी सकाळी अचानक झालेल्या या प्रकाराने पालिकेत एकच खळबळ उडाली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अडवाणी साहेबांना विचारावे की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब यांच्या बोटाला धरुनच भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली आहे. नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे अन्यथा त्यांचा गावागावात शिवसैनिक समाचार घेतील, असा सुचक इशाराच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत लगावला.
मालेगाव, नांदेड व अमरावती येथील निरपराध नागरिकांवर होत असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी साताराचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा पदाधिकारी यांचे दोन दिवसीय पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण शिबिर ओम लॉन्स चचेगाव, कराड या ठिकाणी दि. 30 आणि 31 रोजी पार पडले. या शिबिरात 250 सदस्यांनी भाग घेतला होता.
बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सदर बझारमध्ये एक घटना घडल्यानंतर येथे जमावबंदी आदेश लागू झाला होता. असे असतानाचा त्याचा भंग करत बेकायदेशीर जमाव जमवत सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते.
सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.
सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशा मागणीची तब्बल एक हजार पत्रे भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाग्रस्त सहायता समिती, टास्क फोर्स बनवण्यात आला आहे.
कोरोना सारख्या महाभयंकर वैश्विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत आहेत व त्या ठिकाणी दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोज मृत्यूच्या तांडव बघत असल्यामुळे स्मश
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा शहरात पोवई नाका येथे महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, एमपीएससी परीक्षेचे ढिसाळ नियोजन आणि मनसुख हिरेन आत्महत्याप्रकरणी हे सत्य बाहेर आले आहे, त्यामध्ये माजी पोलीस महासंचालक
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
कराड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्यावतीने महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून 4 कोटी जनतेला आधारात टाकण्याचे पाप करणार्या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष प्रशांत ...
कराड ः दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी खासदार अमर साबळे यांनी केला. येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदे...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.
सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी येरळवाडीतील रहिवासी व पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्य
पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.
वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
दारूची दुकाने सुरू केली पण मंदिरे बंद का? असा सवाल करत ‘दार उघड उद्धवा.. दार उघड व तिघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील अकरा मंदिरांसमोर तसेच पोवई नाक्यावर घंटानाद आंदोलन केले.
कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व
खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन पाठवण्यात आले.