दार उघड उद्धवा दार उघड...
मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे सातार्यातील मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन
दारूची दुकाने सुरू केली पण मंदिरे बंद का? असा सवाल करत ‘दार उघड उद्धवा.. दार उघड व तिघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील अकरा मंदिरांसमोर तसेच पोवई नाक्यावर घंटानाद आंदोलन केले.
सातारा : दारूची दुकाने सुरू केली पण मंदिरे बंद का? असा सवाल करत ‘दार उघड उद्धवा.. दार उघड व तिघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील अकरा मंदिरांसमोर तसेच पोवई नाक्यावर घंटानाद आंदोलन केले.
महाराष्ट्र सरकारने मंदिरे प्रार्थना स्थळे अजूनही बंद ठेवली आहेत, सरकारने दारू दुकाने सुरू केली, इतर व्यवसायही सुरू केले, परंतु प्रार्थना स्थळे बंद ठेवली आहेत. या प्रार्थना स्थळांवर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत, त्यांचे व्यवसाय यावर अवलंबून आहेत. अशावेळी सरकार झोपेचे सोंग घेत असल्याच्या निषेधार्थ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि खा. श्री. छ. उदयनराजे, आ. श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दि. 29 रोजी मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र शासनाला जाग यावी यासाठी सातारा शहरातील आणि परिसरातील मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन झाले. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात आले.
सातारा शहरात 11 मंदिरासंमोर सोशाल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क लावून सातारा शहर आणि परिसरातील सिद्धी मारुती मंदिर राजवाडा येथे सातारा शहर कार्यकारणी पदाधिकारी व आजी माजी नगरसेवक यांनी आंदोलन केले.
नवदुर्गा अंबामाता मंदिर मोळाचा ओढा येथे व्यापारी आघाडी, समर्थ मंदिर येथे वैद्यकीय आघाडीने आंदोलन केले. काळा राम मंदिर, मंगळवार पेठ येथे औद्योगिक आघाडी, हनुमान मंदिर सदर बाजार येथे कामगार आघाडी, तुळजाभवानी मंदिर पोलीस मुख्यालय शेजारी येथे महिला मोर्चा, मारुती मंदिर झेंडा चौक करंजे येथे युवा मोर्चा, आनंदवाडी दत्त मंदिर येथे अनुसूचित जाति मोर्चा, शनि मारुती मंदिर शनिवार पेठ येथे युवती मोर्चा, शाहूनगर दत्त मंदिर येथे शाहूनगर भागातील पदाधिकारी, शाहूपुरी दत्त मंदिर येथे शाहूपुरी भागातील पदाधिकारी, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोयीच्या ठिकाणच्या मंदिरात जाऊन आंदोलन केले. महाराष्ट्र तिघाडी सरकारला जाग येऊन मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करावीत अशी मागणी या वेळी करण्यात आली.
तिघाडी सरकारचा निषेध असो, दार उघड उद्धवा दार उघड, मंदिरे उघडलीच पाहिजेत, मदीरालये उघडली मग मंदिरे बंद का?, प्रार्थनास्थळे मोकळी झालीच पाहिजेत या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणा लिहिलेले बोर्ड कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.
आंदोलनात सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, उपाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, चिटणीस, सुहास पोरे, कोषाध्यक्ष, किशोर गोडबोले, गटनेत्या नगरसेविका सौ. सिद्धी पवार, जिल्हा कार्यकरिणी सदस्य विजयकुमार काटवटे, नगरसेविका सौ. प्राची शहाणे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी संयोजक, डॉ. उत्कर्ष रेपाळ, व्यापारी आघाडी संयोजक डॉ. सचिन साळुंखे, उद्योग आघाडी संयोजक, निलेश शहा, आरोग्यसेवा आघाडी संयोजक विवेक कदम, उपाध्यक्ष प्रदीप मोरे, मनीषा पांडे, डॉ. अजय साठे, चिटणीस वैशाली टंकसाळे, रवी आपटे, महिला मोर्चा अध्यक्ष रीना भणगे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संदीप वायदंडे, युवती मोर्चा अध्यक्ष दीपिका झाड, माजी नगरसेवक किशोर पंडित, तालुका उपाध्यक्ष नितीन कदम, कामगार आघाडी अध्यक्ष तानाजी भणगे, उद्योग आघाडी अध्यक्ष रोहित साने, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. विरेंद्र घड्याळ, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष प्रकाश शहाणे, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मण पटेल ,बाबासो शेलार, सुनिल भूतकर, दत्तात्रय शिंदे, रवींद्र जाधव, राजेंद्र भणगे, दिलीप यादव, अमित भणगे, इथापे सर, अॅड. तिरोडकर, पानसे, दिपक क्षीरसागर, श्रीमती हेमांगीताई जोशी, उद्योजक आघाडी सातारा शहर उपअध्यक्ष सुनील झगडे, उद्योजक आघाडी सातारा शहर उपअध्यक्ष अनिकेत नडे, डॉ. पेंढारकर, महेंद्र कदम, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जोशी, जिल्हा सरचिटणीस मनिष शेठ महाडवाले, जयराज देशमुख, तालुका उपाध्यक्ष अतुल जाधव, गणपत चोरट, मंगेश गोगावले, अमोल कदम, श्रीदवेशेठ, सातारा अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीस विक्रम अवघडे, शहर चिटणीस महेश वायदंडे, जगदीश नगरे, महेंद्र कदम, रमेश माने, श्रीकांत वायदंडे, विकी चव्हाण, दर्शन नगरे, अविनाश दोरके, प्रतीक कदम, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.