मंत्री छगन भुजबळ यांनी बेताल वक्तव्य करुन मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर सरकारच्यावतीने सुमोटो गुन्हा दाखल करावा. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सातारचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांच्याकडे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जिल्हयातील सुमारे ५५० गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भटक्या विमुक्त वर्गाला हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लोक जनशक्ती पार्टीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
सातारा जिल्हा पुर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा काढुन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर केले.
श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, एक लाडू दोन लाडू प्रशासनाला येथेच गाडू, बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, अशा घोषणा देत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
तीन पैशाचा कडीपत्ता सरकार झालं बेपत्ता, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देत जिल्हा परिषदेवर सातारा जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियनच्यावतीने लाटणे मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगळवार पेठ प्रभागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक राहुल महाडिक व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू पाटसकर यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तमाम ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांबाबत आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटण तहसीलदार यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले.
दारूची दुकाने सुरू केली पण मंदिरे बंद का? असा सवाल करत ‘दार उघड उद्धवा.. दार उघड व तिघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील अकरा मंदिरांसमोर तसेच पोवई नाक्यावर घंटानाद आंदोलन केले.
कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व