maharashtra

कराडात एसटी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा

कर्मचारी आक्रमक : राज्य शासनाचा गोंधळ घालून नोंदवला निषेध

Sahatutumb Morcha of ST employees at tehsil office in Karad
राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्‍यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कराड : राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्‍यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून कराड एसटी बस स्थानकाबाहेर महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरात विविध आगारांमध्ये संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कर्मचारी आणखीनच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सहकुटुंब तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज शुक्रवार दि.१२ रोजी त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन स्थळापासून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.
यामध्ये कराड आगारातील सर्व कर्मचारी, त्यांची पत्नी व मुले सहभागी झाले होते. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने आंदोलक कर्मचारी आणखीनच संतप्त झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब मोर्चा काढला. तसेच मोर्च्यात सहभागी झालेल्या आंदोलक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी हातात विविध घोषणांचे फलक झळकवत राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
कराड बसस्थानकाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होत विलीनीकरणासाठी लढा उभारला आहे. त्यानुसार आज कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नसल्याचा इशाराही यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.