भटक्या विमुक्त वर्गाला हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लोक जनशक्ती पार्टीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
सातारा : भटक्या विमुक्त वर्गाला हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लोक जनशक्ती पार्टीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. या मोर्चाची सुरुवात लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मोदी प्रत्येकाच्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. राष्ट्रध्वज श्रीमंतापासून गरीबाच्या घरावर अभिमानाने फडकत होता. मात्र, भटके विमुक्तांच्या घराचा प्रश्न अजून ही प्रलंबित आहे. त्यांनी अजून भटके म्हणून जीवन जगायचं का?, त्यांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चामध्ये करण गायकवाड, सुशांत गायकवाड, राहुल वाघनबरे, अरुण गायकवाड, प्रशांत कीर्तिकर, देवा भोसले,रणजित कसबे, प्रियांका भोसले, सीमा बनसोडे, पंकज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.