सातारा जिल्हा पुर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा काढुन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर केले.
सातारा : सातारा जिल्हा पुर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा काढुन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्यात स्वतःच्या अंगणवाडीचे कामकाज करून कोरोना रोखण्याच्या उपाय योजना करण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी केले. महामारी रोखण्यात राज्यात प्रथम क्रमांक जिल्ह्याने मिळवला. सांगली जिल्ह्यात अशा पद्धतीने काम करणाऱ्या १५ ते १८ हजार रुपये अदा केले, त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील सेविकांनाही मासिक वेतन मिळावे, अंगणवाडी सेविकांना त्यांच्या नेमणूक दिवसापासून मोठ्या अंगणवाडीचा दर्जा व त्याप्रमाणे मानधन अदा करावे, मदतनीस यांना सेविकेच्या ७५ टक्के मानधन मंजूर करावे, सेविका व मदतनीस यांना त्या एकटीच केंद्रावर काम करीत असतील तर केंद्र सरकारच्या जीआर नुसार त्यांना २ हजार रुपये अतिरिक्त मानधन तातडीने देण्यात यावे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेस एक लाख रुपये, मदतनीस व मिनी सेविका यांना ७५ हजार रुपये तर एकरकमी पेन्शन मिळते. सध्याची महागाई विचारात घेता त्यांना तीन पट एक रकमी पेन्शन मिळावी, एप्रिल २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना किमान पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, मिनी अंगणवाडी सेविका आणि नियमित अंगणवाडी सेविका यांना मासिक ५ हजार रुपये परीवर्तन निधी मिळावा, शालेय पोषण आहार बनवणाऱ्या स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचे थकित मानधन लवकरात लवकर मिळावे, त्यांना किमान ७ हजार ५०० रुपये मानधन द्यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात सुरेखा डोळसे, शोभा जाधव, सुरेखा पवार, अलका झेंडे, पुष्पा वेदपाठक, मालन घोरपडे, शशिकला बोराटे, सुरेखा पाटील, पुजा आटपाडकर, राजश्री गाडे, कमल शिंदे, अनिता जाधव, विजय भोकरे, मालक जाधव सहभागी झाल्या होत्या.