तीन पैशाचा कडीपत्ता सरकार झालं बेपत्ता, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देत जिल्हा परिषदेवर सातारा जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियनच्यावतीने लाटणे मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सातारा : तीन पैशाचा कडीपत्ता सरकार झालं बेपत्ता, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही अशा घोषणा देत जिल्हा परिषदेवर सातारा जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियनच्यावतीने लाटणे मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे , गेली पाच महिने केंद्र, राज्य शासनाने आशा व गट प्रवर्तक यांना मानधन दिले नाही. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला इशारा म्हणून राज्यभर लाटणं आंदोलन करण्यात येत आहे. विना मोबदला हेडच्या कामाची सक्ती केली जात आहे. ते थांबवण्यात यावे, विना मोबदला काम करण्यास विरोध केल्यास राजीनामा देण्याची सक्ती थांबवण्यात यावी तसा आदेश काढण्यात यावा, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातमध्ये विना मोबदला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत ओपीडीला ड्युटी लावणे थांबवा, आदी मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात सीमा भोसले, वंदना चव्हाण, कल्याणी सोमदे, नसीमा मुलाणी, सुवर्णा पाटील आदी सहभागी झाल्या होत्या.