भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगळवार पेठ प्रभागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक राहुल महाडिक व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू पाटसकर यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
कराड : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगळवार पेठ प्रभागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक राहुल महाडिक व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू पाटसकर यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
येथील कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ९ येथे रविवारी १६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड शहर उपाध्यक्ष विनायक करपे, हरीश पाटील, प्रवीण शिंदे, रोहित घारे, युवराज साखरे, मोहसिन शेख, सुरज जिरगे, सागर साळुंखे आदी. प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच प्रभागातील नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राहुल महाडिक म्हणाले, जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अमलात आणलेल्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच सुदर्शन पाटसकर मित्र परिवाराच्या वतीने राबविण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सुदर्शन पाटसकर म्हणाले, असंघटीत क्षेत्रातील सुमारे ५ हजार कामगारांना मोफत ई-श्रम कार्ड देण्याचे उद्दिष्ट आम्ही राबवत आहोत. याचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोवीड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत युनिवर्सल पास व लसीकरण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था कन्या शाळेजवळील समृद्धी इंटरप्राईजेस येथे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर आगामी काळात प्रभागातील नागरिकांना मोफत डिजिटल हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक कराड शहराध्यक्ष ॲड.विशाल कुलकर्णी यांनी केले.