मराठा क्रांती मोर्चाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी
समन्वयक समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
मंत्री छगन भुजबळ यांनी बेताल वक्तव्य करुन मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर सरकारच्यावतीने सुमोटो गुन्हा दाखल करावा. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सातारचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांच्याकडे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
सातारा : मराठा समाजाबद्दल कधीही चांगले न बोलणारे मंत्री छगन भुजबळ यांनी बेताल वक्तव्य करुन मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर सरकारच्यावतीने सुमोटो गुन्हा दाखल करावा. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सातारचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांच्याकडे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदन देताना मराठा समाजाच्य वतीने ॲड. प्रशांत नलावडे, शरद जाधव, बापू क्षीरसागर, उमेश शिर्के, संदिप पोळ, वैभव शिंदे, शरद जाधव, बंडू कदम, शेखर मोरे, संजय पाटील, प्रशांत निंबाळकर, शिवाजी काटकर, संतोष सावंत यावेळी उपस्थित होते.
बापू क्षीरसागर म्हणाले, मी छगन भुजबळ या राज्याचे मंत्री म्हणून कोणाबरोबरही ममत्व ठेवणार नाही. तसेच कोणाबरोबर आकस ठेवणार नाही, अशी शपथ घेणारे मंत्री छगन भुजबळ हे कायम मराठा समाजाबद्दल गरळ ओकत असतात. कालच त्यांनी जाहीर मीडियामध्ये मराठा समाजाबद्दल परत एकदा गरळ ओकली आहे. जे आरक्षण संविधानानुसार त्यांना मिळालेले आहे. तसेच कुणबींना मिळाले आहे. काही अज्ञानानुसार गेली पन्नास वर्ष त्या आरक्षणाचा लाभ कुणबी मराठा लोकांना घेता आला नाही. आता तो घेता येईल असे त्यांना दिसताच त्यांचा परत मराठा द्वेष जागा झालेला आहे. त्यांनी काल वक्तव्य केलेले आहे. त्यांनी केलेल्या व्यक्तव्यामध्ये गोंधळ करा, दंगा माजवा, कायदा व सुव्यवस्था बिघडावयची, समाजात तेढ निर्माण करायची वक्तव्य केलेली आहेत. ती सरकारने गांभीयनि घ्यावीत. सरकारने त्यांच्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांचे मंत्रीपद काढून यावे. त्यांच्या पक्षाचे पक्ष प्रमुख आहेत. त्यांनी सुद्धा पक्ष अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी. अशी कारवाई पक्षाकडून त्यांच्यावर झाली नाही तर त्यांच्या पक्षाला येत्या निवडणूकीत मराठा समाज परिणाम भोगायला लावेल, असा इशारा दिला आहे.