भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे यांची वर्णी
भाजपा प्रदेश सचिवपदी पावसकर यांची नियुक्ती
भाजपचे माणचे आक्रमक शैलीचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी ही घोषणा केली. माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती झाली आहे.
सातारा : भाजपचे माणचे आक्रमक शैलीचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी ही घोषणा केली. माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हे संघटनात्मक बदल करण्यात आल्याचे प्रदेश कार्यकारी सूत्रांनी सांगितले. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर जिल्ह्यात राजकीय दबदबा कायम ठेवला आहे. जयकुमार गोरे यांची कार्यशैली आक्रमक असून संघटन कौशल्य वादातीत आहे. भाजपचा जिल्हयातील संघटनात्मक विस्तार मजबूतीने करण्यासाठी गोरे यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विक्रम पावसकर यांनी गेल्या सहा वर्षात भाजपची चांगली मोट बांधली आणि पक्षीय जबाबदाऱ्या नेटकेपणाने पार पाडल्याने त्यांची प्रदेश सचिवपदी वर्णी लागली आहे.
मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लीगल सेलचे महासचिव अखिलेश चौबे यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी चंदकांत पाटील यांनी जयकुमार गोरे यांना जिल्हाध्यक्ष तर विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव नियुक्तीचे पत्र प्रदान केले .प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय परळी चे राजू भोसले यावेळी उपस्थित होते.