भाजप प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा
जातीय तेढ निर्माण केल्याची पोलिसांत तक्रार
वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुर्गा उत्सवाच्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार हमीद खान व नुरखान पठाण यांनी कोरेगाव पोलिसात दिली आहे. त्यानुसार विक्रम पावसकर यांच्यावर आयपीसी १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कराड : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुर्गा उत्सवाच्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार हमीद खान व नुरखान पठाण यांनी कोरेगाव पोलिसात दिली आहे. त्यानुसार विक्रम पावसकर यांच्यावर आयपीसी १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी विक्रम पावसकर यांनी एका कार्यक्रमात धर्माबद्दल अपशब्द वापरून, चिथावणीखोर भाषण करून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. असे तक्रारदारांनी म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. बनकर हे करत आहेत.
तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले असे मला वाटत नाही
संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने पीएफआयचे आतंकवादी विचाराचे जिहादी सापडत आहेत. देशाचे तुकडे करणे हे त्यांचे मनसुबे आहेत. याच ज्वलंत प्रश्नावर दुर्गामाता दौड सांगता कार्यक्रमात मी माझे मत व्यक्त केले होते. त्यामुळे मी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे असे मला वाटत नाही.
- विक्रम पावसकर, प्रदेश सचिव, भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष सातारा