maharashtra

भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

बनावट दस्त केल्याचा पोलिसांकडून त्यांच्यावर ठपका

Atrocity case against five persons including BJP district president Jayakumar Gore
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी दिली आहे.

सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. बोगस माणूस दाखवून जमिनीचा दस्तऐवज करण्यात आल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. भिसे व गोरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये जमिनीचा व्यवहार निश्चित झाला होता. या व्यवहारात मयत इसमाला जिवंत दाखवून दस्त करण्यात आल्याचा आरोप भिसे यांनी केला आहे. दहिवडी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने हे प्रकरण घेतले आहे.
जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह दत्तात्रय घुटुकडे, महेश बोराटे यांच्यासह इतर दोन इसमांविरुद्ध भारतीय दंडविधान 420 417 467 व 468 आणि 471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गोरे यांनी एक महिन्यापूवीध भाजप जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र लगेचच गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने गोरे समर्थकांसह भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे.