maharashtra

भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार

सातारकरांच्या विकासाचा संकल्प राबवणार : भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर

BJP will contest municipal elections with great strength
सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या मागणीला दुजोरा देत भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या मागणीला दुजोरा देत भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
भारतीय जनता पार्टी सातारा  शहरच्या प्रमुख पदाधिकारी आणि नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची महत्वाची बैठक सातारा येथे पार पडली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती
या बैठकीत सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे सर्व पदाधिकार्‍यांनी सांगितले.
यावेळी प्रास्तविक करताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा शहरातील संघटनात्मक आढावा सांगितला तसेच सर्व प्रभागात ताकतीचे उमेदवार उपलब्ध असल्याचे ही सांगितले, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम आणि राबवलेले उपक्रम यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळेल, अशी खात्री व्यक्त केली.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी यांनी सातारा शहरातील भारतीय जनता पार्टी चे संघटन मजबूत झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर निवडून येण्यासाठी काय काय करावे लागते, याचं कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला.
महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ सुवर्णाताई पाटील यांनी महिलांचा सहभाग वाढल्याबद्दल अभिनंदन केले आणि जास्तीत जास्त महिला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सातारा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. पक्षाची ध्येय-धोरणे, आंदोलने, कार्यक्रम सातारा शहरामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडले जातात. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलावर्ग एकत्रितपणे काम करतात याबद्दल आनंद व्यक्त केला आणि याचा फायदा येत्या निवडणुकीमध्ये पक्षाला होईल, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील आणि खात्री व्यक्त केली. त्याचबरोबर सातारा शहर कार्यकारिणीने जी एकोणीस मुद्द्यांची सूची तयार केली आहे त्यातील माहिती आपल्या प्रभागात फिरून उमेदवारांनी गोळा केली तर त्यांना निवडणूक लढवणे अत्यंत सोपे जाईल असे सांगितले. लवकरच सातारा शहर निवडणुकीसाठी कोअर कमिटी ची घोषणा केली जाईल आणि या कमिटी मार्फत सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. पक्षाचे केलेले काम, दाखवलेली निष्ठा, आंदोलनातील कार्यक्रमातील उपस्थिती आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले
मतदार हा लोकशाहीचा राजा : जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर
मतदार हा लोकशाहीचा राजा असून कार्यकर्ता हा मतदार आणि लोकप्रतिनिधी यामधील महत्त्वाचा दुवा असून जनतेच्या भावना लक्षात घेऊन मतदार राजाच्या समस्या निराकरण करण्यासाठी व त्याच्या समाधान करण्यासाठी भाजप लोकप्रतिनिधी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत जनतेची अपेक्षा फार कमी आहे परंतु त्यांचा सन्मान त्यांच्या भावना लक्षात घेऊन कार्य करा असे आवाहन सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी करून भारतीय जनता पक्ष सर्व का साथ सबका विकास सबका विश्वास सबका विकास सार्थ करण्यासाठी समर्थ असल्याचे सांगितले
यावेळी जिल्हाध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते ‘सातारकरांच्या विकासाचा संकल्प’ या संकल्प पेटीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना विक्रम पावसकर म्हणाले, जनतेच्या भावना लक्षात घेऊन देश पातळी पासून तर ग्रामीण पातळीपर्यंत  सुद्धा काही प्रमाणात प्रकाशित करणारा देशाचा एकमेव भारतीय जनता पक्ष असून सातारा शहरातील मतदारांच्या भावना लक्षात घेऊन पाच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी  कार्य केले आहे. सातारा शहरात भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापना करण्याची संधी देण्याची, जनतेची मानसिकता असून त्यांच्या भावना आशीर्वाद घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सातारकरांच्या विकासाचा संकल्प जाहीरनामा मध्ये त्यांचे विचार घेण्यासाठी मोहिम हातात घेतली.
सातारकरांच्या विकासाचा संकल्प पेटी मध्ये सूचना, विकासासाठी योजना सुचवण्याचे आवाहन : भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी
सातारा शहराच्या विकासाचे दायित्व, सातारकरांचे प्रेम, विश्‍वास सार्थ करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून सातारकराची सातारा नगरपालिकेत आता भाजपाच ही आशा-आकांक्षा आणि आशीर्वाद असल्यामुळे, त्यांचे मत जाणून घेऊन सातारकरांच्या विकासाचा संकल्प जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी शहरातील नागरिकांनी शहराच्या विविध भागात ठिकाणी लावण्यात येणार्‍या सातारकरांच्या विकासाचा संकल्प पेटी मध्ये सातारा शहराच्या परिपूर्णतेसाठी सूचना, विकासासाठी योजना सुचवाव्यात, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केले. तसेच जनतेचे विचार घेऊन पुढील वाटचाल करू व शहराचा विकास करू, असाही विश्वास भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी व्यक्त केला.
यावेळी, सर्व मंडल, जिल्हा, प्रदेश पदाधिकारी, विविध आघाड्या, मोर्च्याचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.