maharashtra

भा ज पा तर्फे साताऱ्यात पाकिस्तानचा निषेध

भा ज प कार्यकर्त्यांनी जाळले पाकिस्तानचे झेंडे आणि बिलावलचा पुतळा

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि साताऱ्यातील पोवई नाका येथे पाकिस्तानचे झेंडे आणि बिलावल भुट्टो झरदारी चा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

सातारा : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान आणि जागतिक नेते नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. हा अपमान फक्त भारताचे पंतप्रधान यांचाच नाही तर संपूर्ण देशाच्या अस्मितेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि साताऱ्यातील पोवई नाका येथे पाकिस्तानचे झेंडे आणि बिलावल भुट्टो झरदारी चा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

पाकिस्तानचे सगळे राजकारणी घाबरले आहेत. भारताला G 20 संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे. अशातच संपूर्ण जग भारताच्या मागे उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विश्वनेता म्हणून मान्यता मिळालेली असताना त्यांना कमीपणा यावा म्हणून बिलावल ने हे वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. तसेच १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान चे ९३००० हजारापेक्षा जास्त सैनिक भारताला शरण आले आणि पाकिस्तान फुटला याची सल अजूनही पाकिस्तान्यांच्या मनात आहे. इथून पुढे जर पुन्हा असे बेताल वक्तव्य केले गेले तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नावच पूर्णपणे पुसून टाकले जाईल, असा इशारा या वेळी भा ज पा नेते धर्यशील कदम यांनी दिला.

यावेळी भा ज पा नेते मनोज घोरपडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, कराड उत्तर अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक सुनील काळेकर ,नगरसेवक निलेश माने, प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, निलेश शहा, सचिन साळुंखे, विकास बनकर, प्रभाकर साबळे, रवी आपटे ,रीनाताई भणगे, सुनिशाताई शहा, कोमलताई पवार ,कुंजाताई खंदारे, वैष्णवीताई कदम, आप्पा कोरे ,प्रशांत जोशी, नितीन कदम, चंदन घोडके, विक्रम बोराटे, अविनाश खर्शीकर, महेंद्र कदम नितीन बर्गे ,अमोल टंगसाळे, वैभव  यादव ,अमोल कांबळे, नितीन जाधव , सचिन तिरोडकर, प्रकाश शहाणे, अतुल जाधव, राहुल चौगुले ,दर्शन पवार विकास सणस ,किरण भिलारे, अंजनकुमार घाडगे, माणिकसिंग रजपूत, प्रमोद गायकवाड, सयाजीराव माळी, सतीश भोसले,नयन निकम, सूर्यकांत पडवळ, शंकरराव शेजवळ, शहाजी मोहिते, महिपती यादव, अविनाश पवार, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.