maharashtra

भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल : आ. जयकुमार गोरे


75% Congress will be seen in BJP in future: b. Jayakumar Gore
भाजपला फार मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी अत्यंत संघर्ष करून हा पक्ष उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली. सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार असून भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल असा विश्वास भाजपचे आमदार आणि सातारा जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

सातारा : भाजपला फार मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी अत्यंत संघर्ष करून हा पक्ष उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली. सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार असून भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल असा विश्वास भाजपचे आमदार आणि सातारा जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, अडीच वर्ष जिल्हा परिषद सदस्य आणि तीन वर्ष आमदारकीचा अनुभव माझ्या गाठीशी असून भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच माजी वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत असताना नव्याने संघटनेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांसह जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पक्ष, संघटना अधिक बळकट कशी होईल यासाठी माझे प्राधान्य अधिक असेल.
सध्या सर्वच अस्थिर आहे. सरकार टिकवणे एवढेच महाविकास आघाडीचे काम असून गेल्या दोन महिन्यापूर्वी या सरकारने वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करून त्यांच्या पिकांची राखरांगोळी केली. अधिवेशनामध्ये भाजप आमदारांनी हा विषय लावून धरल्यामुळे तीन महिने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणार नाही अशी घोषणा सरकारने केली असली तरी तीन महिन्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांवर मोठी कुऱ्हाड असणार आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह युवक, महिला विद्यार्थिनी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत असून देशातील अनेक राज्यांनी यावरील टॅक्स कमी करून दरावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात असे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत असे सांगून आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले,  अर्थसंकल्पामध्ये दारूवर सवलत दिली जाते मात्र जीवनाश्यक वस्तूंकडे दुर्लक्ष केले जाते यासारखे दुसरे दुर्दैव काय? भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना सातारा जिल्ह्यात भाजपला नंबर एक क्रमांकावर आणण्याचे काम मी कार्यकर्त्यांच्या मदतीने करणार असून भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल. भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन अनेक जण काम करण्यास इच्छुक आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला तत्कालिन जिल्हाध्यक्ष भारत पाटील, विक्रम पावस्कर, सौ. सुवर्णा पाटील, सुशांत निंबाळकर, भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, भाजपाचे माजी सातारा तालुकाध्यक्ष राजू इंगळे उपस्थित होते.