भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांना पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 12-13 दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सातारा जिल्ह्यातील मलठण, ता. फलटण येथे त्याचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर 5 जानेवारी रोजी सकाळी त्यांना डाॅक्टरांनी डिस्जार्च दिला आहे. हेलिकॉप्टरने आ. जयकुमार गोरे पुण्याहून आपल्या मूळगावी बोराटवाडी, ता. माणकडे रवाना झाले.
राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये जाऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच लवकर तंदुरुस्त व्हा, असा कळकळीचा सल्लाही पवार यांनी गोरे यांना दिला.
आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण शहरात असणार्या बाणगंगा नदीवरील पुलावरुन कार कोसळून अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह एक अंगरक्षक आणि दोन सहकारी गंभीर जखमी झाले. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी फोनद्वारे अपघाताची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली.
जयकुमार गोरे यांनी गत महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सवोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार आमदार जयकुमार गोरे प्रक्रिया करुन सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या मायणी प्रकरणात गोरे यांना जामीन मंजूर झाला आहे.
आमदार जयकुमार गोरे शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने तुर्तास त्यांची अटक टळली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आ. गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना चार आठवडे अटकेपासून दिलासाही दिला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना बुधवारी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.
माण-खटावचे विद्यमान भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांची पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम व महंमद फारुख खान यांच्यावर विविध कलमान्वये वडूज येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिनाभरातील भाजपा आमदार यांच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ झाली आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
भाजपचे आ. जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीच्या बोगस दाखल्याचा आधार घेऊन जमीन हडपण्याचा केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आ. जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक अजय बन्सलं यांना भेटणार आहे. याशिवाय गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी दिली आहे.
भाजपला फार मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी अत्यंत संघर्ष करून हा पक्ष उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली. सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार असून भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल असा विश्वास भाजपचे आमदार आणि सातारा जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
भाजपचे माणचे आक्रमक शैलीचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी ही घोषणा केली. माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती झाली आहे.
दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत. येथील मुले हुषार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. तर काही जण सोन्याच्या दलाईचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.