आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
सातारा : साताऱ्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
सातारा येथील मायणीतील मृत भिसे या व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे आणि महेश पोपट बोराटे यांच्यासह अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून महादेव पिराजी भिसे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
दरम्यान आता या प्रकरणी न्यायालयाने आमदार गोरेंचा अटकपुर्व जामीन रद्द केल्यामुळे त्यांना आता पोलीस अटक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.