राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये जाऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच लवकर तंदुरुस्त व्हा, असा कळकळीचा सल्लाही पवार यांनी गोरे यांना दिला.
सातारा : राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये जाऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच लवकर तंदुरुस्त व्हा, असा कळकळीचा सल्लाही पवार यांनी गोरे यांना दिला.
नागपूर अधिवेशनावरून माघारी परतताना आमदार जयकुमार गोरे यांचे चार चाकी वाहन फलटण नजीक बाणगंगा नदीच्या पुलावरून कोसळून अपघातग्रस्त झाले होते हे अपघातात गोरे यांच्यासह तिघेजण गंभीर जखमी झाले या अपघाताच्या दरम्यान गोरे यांनी स्वतःच फोनवरून अपघात झाल्याची माहिती त्यांचे सहकारी सुशान निंबाळकर यांना दिली आमदार जयकुमार गोरे यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. भाजपच्या बहुसंख्य मंत्री आणि पदाधिकारी यांनी आमदार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली गोरे हे आता तब्येतीने ठणठणीत असून केवळ छातीला थोडासा मुकामार आहे अशी माहिती पूर्वी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली होती शरद पवारांनी गोरे यांनी जवळपास 20 मिनिटे अनौपचारिक संवाद साधला तात्काळ तंदुरुस्त व्हा आणि कामाला लागा असा वडील की चा सल्ला पवार यांनी जयकुमार गोरे यांना दिला वैयक्तिक मतभेद आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी माणुसकीच्या नात्याने गोरे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही परस्पर सहानुभूतीची संवेदना आहे हे दाखवून दिले.


