मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आ. गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना चार आठवडे अटकेपासून दिलासाही दिला आहे.
सातारा : मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आ. गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना चार आठवडे अटकेपासून दिलासाही दिला आहे.
मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्ताात्रय कोंडिबा घुटुगडे रा. विरळी, ता. माण, महेश पोपट बोराटे रा. बिदाल, ता. माण व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिलेली आहे.
ॲट्रॉसिटीचा गुन्हा अजामीनपात्र असल्याने वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालय व सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मग त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला होता. पण त्यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. यावर गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन आ. गोरेंना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चार आठवडे अटक न करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार गोरेंना दिलासा कायम राहिला आहे. आता वडुज न्यायालयात या दिलेल्या वेळेत जामीन घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे, अशी माहिती आमदार गोरेंचे वकील अरुण खोत यांनी दिली आहे.