भाजपचे आ. जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीच्या बोगस दाखल्याचा आधार घेऊन जमीन हडपण्याचा केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आ. जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक अजय बन्सलं यांना भेटणार आहे. याशिवाय गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा : भाजपचे आ. जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीच्या बोगस दाखल्याचा आधार घेऊन जमीन हडपण्याचा केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आ. जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक अजय बन्सलं यांना भेटणार आहे. याशिवाय गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात तपासे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तपासे पुढे म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांनी मयत पिराजी भिसे यांची जमीन हस्तांतरण केली, याबद्दल त्यांना अटक करावी. मागासवर्गीय लोकांच्या जमिनीचा खोटा दस्तऐवज केला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे आम्हाला भूमिका घ्यावी लागत आहे. जयकुमार गोरे यांची आमदारकी रद्द करा याबद्दल राज्यपाल कोशारी यांनाही भेटणार आहोत. याबाबत महाविकास आघाडी च्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटलो आहे. त्यानी कारवाई करण्याच आश्वासन दिलं. यामध्ये पोलीस तपासात काय ते पुढं येईलच. मी युक्तिवाद काय केला त्यापेक्षा न्यायालयापुढे झालेला युक्तिवाद महत्वाचा आहे. आमचं नागरिक म्हणून कर्तव्य आहे'. माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे मी आलो. जिल्ह्यातील एवढे लोकप्रतिनिधी असताना आपल्याला यावे लागले, मग राष्ट्रवादीचे येथील स्थानिक नेते जयकुमार गोरे यांना घाबरतात का, या प्रश्नाला बगल देत ते म्हणाले, इथले मला माहित नाही पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.