jayakumargorewilldemandcancellationofmlapostfromgovernor:maheshtapase

esahas.com

आ. जयकुमार गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार : महेश तपासे

भाजपचे आ. जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीच्या बोगस दाखल्याचा आधार घेऊन जमीन हडपण्याचा केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आ. जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक अजय बन्सलं यांना भेटणार आहे. याशिवाय गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.