माण-खटावचे विद्यमान भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांची पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम व महंमद फारुख खान यांच्यावर विविध कलमान्वये वडूज येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिनाभरातील भाजपा आमदार यांच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ झाली आहे.
मायणी : माण-खटावचे विद्यमान भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांची पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम व महंमद फारुख खान यांच्यावर विविध कलमान्वये वडूज येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिनाभरातील भाजपा आमदार यांच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार गोरे यांच्यावर मायणी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांची मयत असताना जिवंत दाखवून बनावट संमती पत्र तयार केलेच्या कारणावरून ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा मध्ये गोरे व इतर यांना अजून जामीन मिळाला नाही. तोपर्यंत हा दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खटाव-माण मधील जनतेला असला प्रतिनिधी निवडून दिल्याचे शल्य नक्कीच जाणवत असेल.
याबाबत वडूज पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या महितीनुसार, मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मायणी मेडिकल कॉलेजचे विद्यमान अध्यक्ष जयकुमार गोरे, सचिव सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे व इतर तीन सदस्य यांनी अरुण गोरे यांना पी.टी.आर. उतारा मिळणेसाठी सर्वप्रकारचे कामकाजाचे अधिकार देण्यासाठी बदल अर्ज मा.धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांचेकडे दाखल केला होता. अर्ज मंजूर करून यासाठी संस्थेच्या सभासदांना व सह हिस्सेदार यांच्या माहितीसाठी कोणत्याही स्थानिक दैनिकात नोटीस प्रसिद्ध करणेबाबत सांगितले होते.
परंतु संस्थेच्या मालमत्तेवर बोजा चढवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याच्या हेतूने जयकुमार गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे व इतर तीन सदस्यांनी सातारा जिल्ह्यातील एका दैनिकात नोटीस छापून सदर नोटीस माननीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर केली. परंतु ही नोटीस ज्या तारखेस दैनिकात छापली गेली त्या दैनिकाचा एकच अंक तयार करून घेतला होता. त्या तारखेच्या इतर प्रतीमध्ये ही नोटीस न छापले गेल्याची बाब संस्थेचे सभासद आप्पासाहेब देशमुख यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या तारखेचे सर्व अंक तपासून पहिले असतात आमदार गोरे व इतर पाच जण यांनी संस्थेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सभासद व सहहिस्सेदार यांची जाणूनबुजून फसवणूक केल्याचे आढळून आल्यामुळे संस्थेचे सभासद आप्पासाहेब देशमुख यांनी आमदार गोरे व त्यांची पत्नी व इतर सदस्य यांच्या विरोधात वडूज येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख करीत आहेत.