सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना बुधवारी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना बुधवारी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.
मायणी येथील मयत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून संगनमताने जमीन हडपण्यासाठी फसवणूक केल्याचा ठपका आमदार जयकुमार गोरे ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्यासह अन्य चाैघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी आमदार गोरेंनी अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यातील वडूज न्यायालयात प्रयत्न केले होते. परंतु तेथे त्यांना यश आले नाही. बुधवारी आमदार गोरेंना मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे.