मुलांना शिकवा पण, अत्याचार करून शिकवू नका : आ. जयकुमार गोरे
दिमाखदार सोहळ्यात वडूज नगरीत 'पोद्दार' शाळेचा शुभारंभ
दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत. येथील मुले हुषार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. तर काही जण सोन्याच्या दलाईचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
वडूज : दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत. येथील मुले हुषार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. तर काही जण सोन्याच्या दलाईचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
वडूज येथील वडूज- दहिवडी रस्त्यावरील पोद्दार लर्ण स्कूलच्या शुभारंभ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. यावेळी आ. महेश शिंदे यांची बहीण डॉ. अर्पणा ताई बर्गे, वडुजच्या नगराध्यक्षा मनिषा काळे, अध्यक्षा ऍड. माधुरी प्रभुणे, धनंजय फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय जगताप, पोद्दार स्कूलचे प्रिन्सिपॉल ए. के. सिंग, प्राजक्ता गायकवाड, महादेव शिंदे, जेष्ठ पत्रकार सुजित आंबेकर, अनिकेत मतकर, विजयकुमार बनसोडे, तेजस्वी जगताप, सागर बनसोडे, कोमल राऊत व सनदी लेखापाल अभिजित दिवेकर आदि. मान्यवर उपस्थित होते.
वडुजच्या माळरानावर धनंजय जगताप यांनी प्लॉटिंग करण्याचे धाडस केले आहे. त्याला यश मिळाले असून शिक्षण क्षेत्रात ही यश मिळणार आहे, असे सांगून आ. गोरे म्हणाले, माण-खटाव मधील मुलं घडविण्यासाठी पालकवर्ग त्यांना पुणे, सांगली, सातारा येथे पाठवितात. आता वडूज नगरित तशी संधी उपलब्ध झाली आहे. जन्मापासून येथील भूमिपुत्रांना दळणवळण व पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पायाभूत सुविधा व पाणी पुरवठा करण्यासाठी अडचणी येत होत्या. पण, शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले, ४५ वर्षात आमदारकीची तिसरी टर्म आहे. वेगाने परिवर्तन घडवून आणले आहे.
पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देण्याची मागणी करीत होते. आता शेतीला पाणी आल्याने ऊस तोडणी करण्यासाठी लवकर तोड पाठवावी अशी लोक मागणी करीत आहेत. बारामती सारख्या सुपीक भागातील माणसं या भागात मुली देण्यास माण-खटावमध्ये आले, पाहिजे असा विकास करून दाखविणार असे ही आ गोरे यांनी सांगितले. सर्वानाच मदत करणे हे कर्तव्य असून ते पार पाडत आहे, संस्था चालविणे अवघड असले तरी काही संस्था चांगल्या चालल्या आहेत असा ही दावा त्यांनी केला.
पोद्दार स्कूल विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी देवयानी धनंजय जगताप, कुमार आर्य अभिजित दिवेकर तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी शाळेच्या नूतन लोगो चे प्रकाशन आ. गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सपना ढपळे व आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्तविक व आभार ऍड. माधुरी प्रभुणे यांनी मानले.
कार्यक्रमाला नगरसेविका रेखा श्रीकांत बनसोडे, सौरभ माने,डॉ संदीप देशमुख, सागर साळुंखे, धनाजी जाधव, धनाजी पाटोळे, सिद्धार्थ गुंडगे, काकासाहेब बनसोडे, संजय राऊत व विध्यार्थी,पालकवर्ग, शिक्षक व कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.