कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.
फलटण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत. श्रावणही विनापूजा, दर्शनाचा गेला. आता पितरांच्या आठवणींचा भाद्रपदाचा पितृपक्ष दि. 2 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. एकीकडे कोरोना महामारीचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे लोकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने उपासमारीने लोक मरण्याची वेळ आली आहे. त्याबाबत राज्य सरकार संभ्रमीत असून, कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने सरकारला जागे करण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने फलटण शहरामध्ये जैन मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्रीराम मंदिर, चांदतारा मशीद आणि कोळकी येथील हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी दि. 1 सप्टेंबरपर्यंत शासनाने मंदिरे खुली केली नाहीत तर मंदिराची कुलपे तोडून भाविकांसाठी मंदिर खुली करून देण्याचे आंदोलन ‘भाजपा’ला करावे लागेल, असा इशारा यावेळी नगरसेवक अनुप शहा यांनी दिला आहे.
या आंदोलनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, जिल्हा चिटणीस मुक्ती शहा, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरपरिषदेतील गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक अनुप शहा, सचिन अहिवळे, अमरसिंह नाईक-निंबाळकर, पै. बजरंग गावडे, उदय मांढरे, ज्येष्ठ नेते माणिक शहा, संजय चिटणीस, जाकिरभाई मणेर, रियाज इनामदार, कोळकी ग्रामपंचायत माजी सदस्य गणेश घाडगे, संदीप नेवसे, रामभाऊ शेंडे, बाळासाहेब काशीद, प्रदीप भरते, राजाभाऊ जगदाळे, अरविंद शिंदे, रणजित जाधव, अभिजित शिंदे, महिला आघाडीच्या उषा राऊत, नीलेश चिंचकर, राजकुमार देशमाने, नितीन जगताप, युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप जाधव, संदीप साप्ते, राजेश शिंदे, राहुल आव्हाड, दत्तात्रय खेडकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.