काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवतगीता चा दाखला देताना अत्यंत हीन दर्जाच्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या विकृत विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले त्या बद्दल भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले आणि शिवराज पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
सातारा : काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवतगीता चा दाखला देताना अत्यंत हीन दर्जाच्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या विकृत विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले त्या बद्दल भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले आणि शिवराज पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी जाहीर सभेमध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि भगवतगीता या बद्दल अपशब्द वापरून हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे , भगवतगीता हा फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात पूजनीय आणि अनुकरणीय असा ग्रंथ आहे , त्या बद्दल अपशब्द वापरणे म्हणजेच देशाबद्दल अपशब्द वापरण्यासारखेच आहे , शिवराज पाटील आणि काँग्रेस च्या सडक्या मेंदूचा भा ज पा तर्फे आम्ही निषेध करतो आणि हिंदू धर्म आणि धर्मग्रंथावरील टीका सहन केली जाणार नाही , त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी,सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश नलावडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, इ उपस्थित होते.