खटाव भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
वडूजमध्ये भाजपच्या वतीने निदर्शने, घोषणाबाजी
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
वडूज : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक वचन शहा, जयवंत पाटील, अजय शेटे, संजय कुंभार, बाळासाहेब पंडोळे, विशाल महामुनी, किरण काळे, राहुल लोहार, उदय इंगळे, सूर्यकांत कोकाटे, महादेव जाधव, पांडुरंग माने, नागेश झेंडे, राजू जाधव, सचिन माने, संदीपान माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये मंथली हप्ता गोळा करण्याचे काम निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्यावर सोपवल्याची खळबळजनक आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केले आहेत. ही बाब गंभीर असून महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असून, मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
तर आंदोलनवेळी महाविकास आघाडीचा धिक्कार असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. माने यांनी मनोगत व्यक्त केले.