विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटिशीचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि नोटीस जाळली.
सातारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटिशीचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि नोटीस जाळली.
पोलीस ट्रान्सफर रॅकेट घोटाळा देवेंद्रजींनी उघड केल्याने, त्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवून बोलवण्यात आलं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना नोटीस आली की, गायब होतात, पोटात दुखतं, नको तिथं दुखतं,
घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवले जाते आणि घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावले जाते, ही कुपोषित बुद्धी असलेल्या राज्य सरकारचा भा ज पा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. राज्यशासनाच्या विरुद्ध बोंबाबोंब केली, यावेळी ठाकरे सरकार चा निषेध असो, महा विश्वासघातकी आघाडी चा निषेध असो, लक्षात ठेवा झुकणार नाही, घोटाळे बाहेर काढणारच या घोषणा दिल्या.
विरोधी पक्ष नेत्याला नोटीस देऊन अपराध्यासरखें चौकशीसाठी बोलावणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. राज्य शासनाने ही नोटीस रद्द करून माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ऍड प्रशांत खामकर, चिटणीस विजय गाढवे, सुनील जाधव, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रिया नाईक, किसान मोर्च्या तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, तालुका उपाध्यक्ष सुभाष माने, शहर चिटणीस रवी आपटे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष युवा मोर्च्या अध्यक्ष विक्रम बोराटे, विक्रम पवार, अविनाश खर्षिकर, शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष संतोष सुतार, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजय कासट, सोशल मीडिया चे अभिजित लकडे, चैतन्य जोशी, अक्षय इंगवले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.