भाजपच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत असणार्या महिला व युवक संपर्कप्रमुख यांची आज बुधवारी सकाळी दहा वाजता पनवेल, नवी मुंबई येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास हॉलमध्ये बैठक उत्साहात संपन्न झाली.
सातारा : भाजपच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत असणार्या महिला व युवक संपर्कप्रमुख यांची आज बुधवारी सकाळी दहा वाजता पनवेल, नवी मुंबई येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास हॉलमध्ये बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीला भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री संगमलाल गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थान ओबीसी मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांनी भूषविले. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, प्रभार संजय कुटे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संजय गिते, बापू घडामोडे, शंकरराव वाघ यांच्यासह ओबीसी मोर्चा महिला संपर्क प्रमुख वनिता लोंढे, प्रदेशाध्यक्ष करण मोरे उपस्थित होते.