कोविड स्मशानभूमीच्या शेजारील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
जयकुमार शिंदे व ग्रामस्थांची प्रांतांकडे निवेदनाद्वारे मागणी
कोरोना सारख्या महाभयंकर वैश्विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत आहेत व त्या ठिकाणी दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोज मृत्यूच्या तांडव बघत असल्यामुळे स्मश
फलटण : कोरोना सारख्या महाभयंकर वैश्विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत आहेत व त्या ठिकाणी दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोज मृत्यूच्या तांडव बघत असल्यामुळे स्मशानभूमीच्या शेजारी असणार्या शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर येत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. स्मशानभूमीच्या शेजारूनच कॅनॉल जात असल्यामुळे त्याची राख कॅनॉलमध्ये टाकली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. या परिस्थितीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून स्मशानभूमीच्या कडेला मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे लावून किंवा त्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे व सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव रामभाऊ शेंडे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रणजीत जाधव, प्रदीप भरते, गोरख जाधव, अजय भुजबळ, नीलेश भुजबळ, विजय भुजबळ, महेश भुजबळ, राजेंद्र पोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेतील, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.