sports

चालू शैक्षणिक वर्षात ३० टक्के शैक्षणिक शुल्क माफ करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची मागणी

चालू शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्य
चालू शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चालू वर्षातील शैक्षणिक अडचणीबाबत चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करण्यात यावी. प्रवेश नोंदणी करत असताना एकूण शुल्काच्या कमाल १५ टक्के शुल्कासह प्रवेश द्यावा. उर्वरित शुल्क ४ टप्प्यात आकारले जावेे. तसेच अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठाने तात्काळ परत करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कराड जिल्हा संयोजक ऋषिकेश पाटील, सहसंयोजक अजय मोहिते, कराड शहर मंत्री संकेत गवडे, कराड जिल्हा (एस एफ डी) प्रमुख प्रशांत साळवे आदी उपस्थित होते.