पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.
पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी पोलीस प्रशासनास याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले.
यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, विश्वस्त रणधीर जाधव, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, अंकुश जाधव, रोहन देशमुख, प्रवीण जाधव, सुसेन जाधव, दीपक तोडकर, सचिन जाधव, नीलेश जाधव, शिवतेज हिंगमीरे, विनोद जाधव व ‘भाजपा’चे कार्यकर्ते तसेच भाविक उपस्थित होते.