bjpagitatesforopeningoftemplesinpusegaon

esahas.com

पुसेगावात मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी ‘भाजप’तर्फे आंदोलन

पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.