maharashtra

भाजपा चे सातार्‍यात निषेध आंदोलन

अजित पवारांच्या फोटो ला मारले जोडे, पायदळी तुडवला फोटो

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. याचा निषेध म्हणून सातारा शहरात भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

सातारा : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. याचा निषेध म्हणून सातारा शहरात भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या सुरवातीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या शिल्पाकृतीस पुष्पहार अर्पण करून, पुष्पवृष्टी करण्यात आली आणि नंतर रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात आले.
ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मांध औरंगजेब याचे अत्याचार चाळीस दिवस सहन केले, पण धर्म बदलला नाही, ते धर्मवीर नव्हतेच, असा अजब आणि विकृत शोध राष्ट्रवादी कॉंग्रेस ने लावला आणि तेच शब्द अजित पवार यांनी विधिमंडळात काढले. त्यांचे काका शरद पवार यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही, असे विधान केले होते. थोडक्यात संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस छत्रपतींच्या घराण्याचा वारंवार अपमान करत आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी न म्हणता यापुढे जिहादी कॉंग्रेस म्हणावे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त झाल्या. त्याच प्रमाणे छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणारे संजय राऊत, स्वतः ला मोठे समजणारे अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा अजूनही निषेध केला नाही. ते कोणत्या बिळात लपून बसले आहेत याचाही शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांचा अपमान करणार्‍यांना कडक शासन करणारा कायदा करणार असल्याचे विधिमंडळात स्पष्ट केले आहे. तो कायदा लवकर करून पहिला गुन्हा अजित पवार यांच्यावर दाखल करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, भटकेमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवी पवार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सीमा चौहान, जील्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हाचिटणीस विजय गाढवे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, शहर उपाध्यक्ष वैशाली, टंकसाळे नितीन कदम शहर चिटणीस रवी आपटे, संतोष प्रभुणे, कुंजा खंदारे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका प्राचीताई शहाणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, सातारा शहर सोशल मीडिया अध्यक्ष कुणाल मोरे, आयटी सेल अध्यक्ष अभिजीत लकडे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष वीरेंद्र घड्याळे, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अविनाश खर्शीकर, ओबीसी मोर्चा युवती अध्यक्ष वनिता पवार, वैष्णवी कदम, नेहा लाटकर, निर्मला पाटील, संगीता जाधव, सीमा गायकवाड, जयश्री भोसले, कमल राऊत, अमोल कांबळे, मनीषशेठ महाडवाले, विक्रम अवघडे, अमोल टंगसाळे, दर्शन पवार, धीरज सोनवणे, आशिष मिरगे, अविनाश पवार, रवी ताथवडेकर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.