फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कायम भूमिका घेत असल्याच्या कारणाने व पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींच्या वर खोटेनाटे आरोप करत असल्याकारणाने जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
सातारा : फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कायम भूमिका घेत असल्याच्या कारणाने व पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींच्या वर खोटेनाटे आरोप करत असल्याकारणाने जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
दिगंबर आगवणे यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्त्यांच्याबाबत पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रक्रियेपासून बाजूने करण्यात आले होते. परंतु वारंवार पक्षाच्या विरोधामध्ये खोटेनाटे आरोप करत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.