sports

कराडला भाजपाचे महावितरण कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन


कराड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्यावतीने महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून 4 कोटी जनतेला आधारात टाकण्याचे पाप करणार्‍या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस राहुल भिसे, प्रमोद शिंदे, युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन पाटस्कर, युवा मोर्चा कराड अध्यक्ष विशाल कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्ष सिमा घार्गे, सरचिटणीस धनश्री रोकडे, उत्तरच्या उपाध्यक्षा नम्रता कुलकर्णी, कामगार आघाडीचे अध्यक्ष विश्‍वनाथ फुटाणे, अभिषेक कारंडे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, उल्हास बेंद्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.